📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रस्ता व गटारीसाठी सोयगाववासीयांचे आंदोलन

सोयगाव (प्रतिक 'बंटी बच्छाव) सोयगाव येथील प्रभाग क्र. 10 मधील नागरिकांनी आज सोयगाव कमानी जवळ रास्ता रोको करत आंदोलन केले
 याबाबत सविस्तर वृत्त असे की सोयता प्रभाग क्रमांक 10 मधील शहरी आरोग्य केंद्र समोरील परिसरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून बऱ्याच दिवसांपासून या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे, पावसाळ्यात नागरिकांना घरासमोर गुढग्याएवढ्या पाण्यातून रस्ता काढावा लागतो, याशिवाय पक्का रस्ताही नसल्याने  वाहनधारकांची तारांबळ उडते, बऱ्याच दिवसापासून या परिसरातील रहिवाशांची मागणी असताना सुद्धा अद्याप पावेतो रस्ता व गटार तयार झाली नाही त्यामुळे नागरिकांनी सोय गावच्या छत्रपती शिवाजी महाराज कमानी समोरील रस्त्यावर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले यावेळी महिलांनी तीव्र आक्रोश करत प्रशासनाला जबाबदार धरत नगरसेवकांनाही या गोष्टीचे जबाबदार धरले यावेळी सौम्य या स्वरूपाचे आंदोलन असले तरी या बाबतीत लवकर उपाययोजना न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने