मालेगाव (जय योगेश पगारे) साप नाव ऐकताच भल्याभल्यांची गाळण उडते, आणि समोर आठ दहा फुटांचा साप बघितला तर बोबडी वळल्याशिवाय राहत नाही, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, पावसाळ्यात बिळात पाणी जाऊन साप स्वसंरक्षणार्थ सुरक्षित जागेच्या शोधात जमिनीवर येतात आणि कोरड्या जागेच्या शोधात जमिनीवर घरात, कार्यालयात अथवा इतर ठिकाणी आसरा घेतात
असाच एक साप चक्क एटीएम मशिन मध्ये घुसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे,
मालेगावातील व्हिडिओ असल्याचं सांगत तो फॉरवर्ड केला जात आहे,
परंतु मालेगाव लाईव्ह चा उद्देशच आहे की बातमीचा मुळ शोधून त्यातील सत्यता तपासून पाहणे व वाचकांना त्या बाबतीत अवगत करणे
या व्हिडीओ चे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडीओ आय सी आय बँकेच्या एटीएम सेंटर चा आहे, दुसरी बाजू म्हणजे या व्हिडीओ मध्ये बोलण्याचा आवाज ऐकू येत आहे तो हिंदी संभाषणाचा आहे, त्यामुळे हा व्हिडीओ हिंदी भाषिक प्रदेशामध्ये असल्याचे सिध्द होते, त्यानुसार आणखी शोध घेतला असता सदर घटना ही उत्तर भारतातल्या गाझियाबाद मधली असल्याचे लक्षात येते, त्यानंतर ही घटना कधी घडली याबद्दल शहानिशा केली असता मागील वर्षी मे महिन्यात घडली आहे, आणि नंतर त्या बिनविषारी धामण जातीच्या सापाला वनविभागातर्फ पकडुन सुरक्षित स्थळी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा वन अधिकारी डॉ. दीक्षा भंडारी यांनी दिली
व्हिडिओ बघा
https://youtu.be/f1NRmEeK2DI