सौदी अरेबिया (दुबई प्रतिनिधी: निलेश उंडे) जगातील वाढत्या कोरोनाच्या संकटात, तसेच कोरोना चे नवनवीन वेगवेगळे धोकादायक स्ट्रेन आणि त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने इतर देशातून हज यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंवर सौदी अरेबिया प्रशासना निर्बंध घालण्याचा विचारात आहे.
पवित्र मक्का मदिना हे मुस्लिम बांधवांचे तीर्थस्थळ आहे, हज यात्रेसाठी जगभरातून खूप मोठ्या संख्येत भाविक यात्रेकरू मक्का मदिना येथे येत असतात, परंतु सध्या कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जगातील प्रत्येक प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे, अशातच एवढा मोठा जनसमुदाय एका ठिकाणी जमा झाला तर हा धोका आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे इतर देशातून येणाऱ्या यात्रेकरूंवर बंदी घालणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळत आहे.