मालेगाव (दि.30) मिर्झा गालिब यांचा एक शेर खूप प्रसिद्ध आहे " मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल, मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया!" याप्रमाणे आज एका पर्यावरणप्रेमी आदर्श शिक्षकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभेच्छा देणाऱ्या आप्तेष्टांना चक्क 'कामाला' लावत शुभेच्छा म्हणून वृक्षारोपण करण्यास सांगितले आणि अशा अत्यंत जगवेगळया उपक्रमाचे महत्व लक्षात घेता जवळपास सर्वच मित्र-आप्तेष्टांनी आज शक्य तेथे वृक्षारोपण करीत समाजात एक अत्यंत संवेदनशील संदेश दिला आहे...
आजकाल वाढदिवस म्हणजे फक्त मौज करण्याचा एक 'एक्स्ट्रा चान्स' म्हणून आजकालची तरुण मंडळी दिसत आहे, चौकात तलवारीने केक कापणे,बार मध्ये जाऊन पार्ट्या करणे हे आजकालच्या 'कार्ट्याचें' उद्योग ! तर काही मंडळी स्वतःच स्वताच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या मोठ्या होर्डिंग लावत अशा केविलवाण्या प्रसिद्धीचे भुकेले असतात ,
परंतु एक आदर्श शिक्षक काय असतो आणि काय करू शकतो हे आज एका शिक्षकाने दाखवून दिले आहे सचिन बाळासाहेब पगारे असे या शिक्षकाचे नाव असून ते मालेगाव तालुक्यातील कुकाने येथील रहिवाशी आहेत मराठा विद्याप्रसारक समाजच्या निफाड येथील शाखेत उपशिक्षक पदावर कार्यरत असलेले पगारे सर यांचा मित्रपरीवार-गोतावळा तसा खूपच मोठा, अत्यंत संयमी, अभ्यासू , जिज्ञासू आणि मनमिळावू असे आणि विशेष म्हणजे 'बचपन से लेकर पचपन तक' असे सर्व वयाचे मित्र असणारे हे व्यक्तिमत्व, आणि अश्या या प्रेमळ मित्राच्या आवाहनाला प्रतिसाद न देण्याची हिम्मत कोणत्याच मित्रात नाही त्यामुळे जवळपास सर्वच मित्रांनी पगारे सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या परिसरात एक झाड लावून अश्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या.
मालेगाव लाइव ने ह्या उपक्रमाबद्दल जाणून घेतले असता सरांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाकडून एक तरी झाड लावून घेऊ अशी सुंदर कल्पना मांडली , आणि जसा शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला तसा त्यांना रिप्लाय मध्ये एक झाड लावण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सुंदर उपक्रमाला प्रतिसाद देत जवळपास सर्वांनीच वृक्षारोपण केले.
मागील काही दिवसात कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने अनेकांचे जीव घेतले, त्यातच सर्वाधिक मृत्यू वेळेवर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाल्याचे सर्वश्रुत आहे, आणि अशातच झाडे हि निसर्गाची अशी अनमोल देणगी आहे आहे जी कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थ भावनेने अमर्यादित ऑक्सिजन सृष्टीला पुरविते , या कठीण काळातच मानवाला खरी ऑक्सिजनची किंमत कळली असे म्हणणे वावगे ठरणार नाही अशी भावना यावेळी सचिन पगारे यांनी व्यक्त केली.
अशा या आदर्श उपक्रमाचे अनुकरण सर्वानी केले आणि प्रत्येक वाढदिवसाला अशी पुनरावृत्ति झाली तर पुन्हा कधी ऑक्सीजनच्या कमतरतेचे संकट जगावर येणार नाही !
![]() |
आदर्श शिक्षक सचिन बी. पगारे |
खुपच चांगला ऊपक्रम आहे भाऊ
उत्तर द्याहटवाछान उपक्रम
उत्तर द्याहटवा