📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रावळगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याचा हाहाकार, गारपीटी सह पावसामुळे अनेकांची शेते, घरे उद्ध्वस्त!

रावळगाव ( संदीप शिल्लक  ) रावळगाव जळगाव परिसरात आज दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पावसात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आणि गरिबांची घरे सुद्धा उध्वस्त झाली आहेत,
 आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास अत्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसात गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांची  पिके जमीनदोस्त झाली आहेत, शेताचे बांध फुटून पाणी वाहत आहे, अनेक ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी आहे याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे अनेक गरीब लोकांचे घराचे छप्पर उडून गेले शेतकऱ्यांचे शेड उन्मळून पडले अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, याशिवाय पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चाळींचे ही मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे, चाळीत भरून ठेवलेला कांदाही काही ठिकाणी वाहून गेला आहे
 अत्यंत भयानक परिस्थिती सर्वत्र पहावयास मिळत आहे, यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
काही गरीब आदिवासी बांधवांच्या झोपड्यांवरील छप्पर उडून गेल्याने त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण घर उध्वस्त झाले आहे, व लेकरा बाळांसह हे गरीब मजूर आदिवासी रस्त्यावर आले आहे. काही ठिकाणी पत्रे उडून फार दूरवर फेकले गेले आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे डाळिंब पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ डाळिंबाची झाडे उन्मळून पडली आहेत.
शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व स्तरातील लोक करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने