सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये कोण काय पोस्ट करेल याचा भरवसा उरला नाही, सध्या पॅलेस्टाईन व इजराइल यांच्या मधल्या तणावाबाबत संपूर्ण जगाला कुतूहल निर्माण झाले आहे, भारतातील बरेच नागरिक इस्राईलचे याबाबतीत समर्थन करीत आहे,
इजराइल व पॅलेस्टाईन यामध्ये भूमी वादावरून सध्या वादंग उठले असून परिस्थिती अत्यंत चिघळली आहे, पॅलेस्टाईन च्या बाजूने उभे राहण्यासाठी तुर्की या देशाने सर्व मुस्लीम देशांना एकजूट होऊन इजराइल च्या विरोधात युद्ध करण्यास सांगितले,
दुसरीकडे इजराइल च्या एअर डिफेन्स सिस्टिम चा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर खपवला जात आहे,
ज्यामध्ये असे दाखवण्यात येत आहे की इजरायल चे एअर डिफेन्स सिस्टिम तुर्की व इजिप्तच्या लढाऊ विमानांचा वेध घेऊन कशाप्रकारे खातमा करीत आहे, परंतु सदर व्हिडिओ हा एक व्हिडिओ गेम असून त्यातील आहे, AARMA 3 नामक व्हिडिओ गेम मधील ही दृश्य आहेत,
मालेगाव लाईव्ह च्या पडताळणीत अशा प्रकारच्या पाच व्हिडीओ एकत्र करून एक पाच मिनिटाची व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे, व ती आपल्या व्हाट्सअप वर प्रसारित करण्यात आली आहे
अशा प्रकारची कुठलीही व्हिडिओ आपल्याला आल्यास त्याची शहानिशा न करता शेअर करणे चुकीचे आहे, अशाप्रकारचा कुठलाही व्हिडिओ आपल्याला आला तर आपण तो मालेगाव लाईव्ह कडे पाठवून त्याची पडताळणी करून घेऊ शकता