📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

म्युकरमायकोसिस : म्हणजे काय? काळजी व उपचार..

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य रोग [  फंगस ] आहे. हा रोग 'म्युकोरेल्स' या फंगस मुळे होतो.
कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [ फंगस] घेते व या रोगाला ला सुरुवात होते. नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये, तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात, डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.
या बुरशीचा पसराव अति वेगाने असून उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर
औषधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो पण उशीर झाला तर शस्त्रक्रिया पण करण्याची वेळ येते.

रिस्क फॅक्टर्स -

कोरोना सोबत खालील रोग असल्यास म्युकरमायकोसिस ची लागण लवकर होते.......

1. मधुमेह / डायबिटीज
2. HIV/AIDS.
3. जास्त वेळ व मात्रा मधे स्टेरॉइड्स चा वापर.
4. ब्लड प्रेशर
5. विविध कँसर
6. लिव्हर सिरोसिस
7. अति लट्ठपणा

* निदान करण्यासाठी लक्षणे *

* तोंड व दांत *
चेहऱ्यावर सज येणे,
तोंडातून दुर्गंधी येणे,
तोंडातून पु येणे,
हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे,
अचानक दात हालणे व पडणे,
दातांची जखम न भरणे.

*नाक*

सर्दी असणे
नाक बंद असणे
साइनस च्या जागेत दुखणे
नाकातून रक्त येणे

*डोळे*
डोळे दुखणे व सुजणे डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे

*मेंदू *
डोके दुखणे
मेंदूच्या नसांचा त्रास होणे

* निदान कसे करणार*

1. * बायोप्सी (Biopsy)* बुरशी च्या जागेतुन तुकड़ा काढून टेस्टिंग करणे.
2. नाकातुन स्वॅब घेऊन तपासणी / fungal culture
3. *रेडियोलॉजिकल*
#CT Scan or MRI PNS & orbit or brain

वरील लक्षणे आढळ्यास खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.
1. दंतरोग तज्ञ
2. नाक, कान, घसा तज्ञ
3. नेत्र रोग तज्ञ
4. मेंदु रोग तज्ञ
5. फिजिशियन

*कोरोनाच्या संकटातुन बरे झाल्या नंतर म्युकोर मायकोसिस न होवो यासाठी घ्यावयाची काळजी

1. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवा.
2. स्टेरॉइड चा गरजे पेक्षा जास्त वापर नको.
3. अक्सिजन थेरपी साठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर
ह्युमिडीफायरसाठी करा.
4. रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
5. कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

उपचारासाठी -

राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकॉसिस वर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच बरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत च्या रुग्णालयात ही हे उपचार मोफत होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने