📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून करुण अंत

जळगाव( बातमीदार) जळगाव तालुक्यातील धानोरा येथे लघु प्रकल्पात मामा व दोन भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. १८ मे ( आज ) रोजी पहाटे घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील धानोरा येथील महासिद्ध लघु प्रकल्पात मामा व दोन भाच्यांची बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी समोर आली. पुणे येथे नोकरीवर असलेला विनायक गाडगे (वय २७), त्याचा काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय १८) व त्यांचे दाताळा येथील मामा नामदेव वानखडे (४३) तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले. पण रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केला. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्थानकात दिली. धरण परिसरात शोध सुरू असतांना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले. तोपर्यंत रात्र झाल्यानें अंधारात शोध मोहिम थांबविण्यात आली होता. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये त्यांचे मुतदेह तरंगताना दिसले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने