मालेगाव (जय ) मालेगाव शहरातील मोसमपुल चौकात सिग्नल यंत्रणेच्या यशस्वी चाचणीनंतर आता एकात्मता चौक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणेचे महत्व प्रशासनास पटले आहे त्यानुसार मोसम पुलावर स्थानिक नगरसेवकांचे पुढाकारातून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती व इतर दोघे चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी असे आवाहन करण्यात आले होते, काल महापालिकेने यासाठी निविदा मागविल्या आहेत व कामाची मुदत 90 दिवसांची ठेवलेली आहे त्यानुसार येत्या 3 महिन्याच्या आत दोघ चौकांमध्ये यंत्रणा कार्यान्वित होईल अपेक्षा आहे.
