📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जिल्ह्यामध्ये निर्बंध अधिक कडक

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले की, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे जिल्ह्यामध्ये सुरू असलेले निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अत्यावाश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजता बंद होतील. सर्व हॉटेल व बार रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, नांदगाव, नाशिक तालुक्यातील संख्या वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात येत आहे. लग्न समारंभांना 15 मार्चनंतर बंदी घालण्यात आली आहे. सर्व मंदिरे सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.
तर मालेगाव मध्ये मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी शहरातील सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस पुढील काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा केली असून उद्यापासून हे सर्व बंद ठेवण्यात येणार आहे असे मालेगाव मनपा आयुक्त कासार यांनी सांगितल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने