📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*

 *जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३४ हजार ०९१ रुग्ण कोरोनामुक्त*

*सद्यस्थितीत १७ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरू*


*नाशिक, दि.२४ मार्च, २०२१  :*

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ०९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १७ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३०६, चांदवड ३७५, सिन्नर २८८, दिंडोरी २४४, निफाड ६८८, देवळा ५८३, नांदगांव ६५८, येवला २०१, त्र्यंबकेश्वर ४१, सुरगाणा १८, पेठ २७, कळवण ३१, बागलाण ४७९, इगतपुरी १९५, मालेगांव ग्रामीण ४३३ असे एकूण ४ हजार ५६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार १४७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २४४ तर जिल्ह्याबाहेरील २६५ असे एकूण १७ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ५६१ रुग्ण आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८७. ८६ टक्के, नाशिक शहरात ८७.६४ टक्के, मालेगाव मध्ये ८०.८८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.१९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.३२ इतके आहे.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ९०५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८६ व जिल्हा बाहेरील ६३ अशा एकूण २ हजार २४७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

*लक्षणीय :*

◼️१ लाख ५३ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ३४ हजार ०९१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार २२३ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७ .३२ टक्के


*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

                  0000000

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने