📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

बाळासाहेब बच्छाव यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा.

जायखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वाहतूक पोलिस रविराज बच्छाव यांनी गेली अनेक दिवसांपासून समाजसेवेचा वसा जपला आहे. अनेक गरजू लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे. याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्राला आली असून बच्छाव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतेच त्यांचे वडील बाळासाहेब गोविंद बच्छाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बच्छाव यांनी एकशे एक विविध प्रकारचे वृक्षारोपण केले. हे वृक्षारोपण मालेगाव शहारापासून वडणेर, अंबासन, नामपुर आणि टेंभे येथील परिसरात ठिकठिकाणी केले आहे. विशेष म्हणजे या झाडांचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी लोखंडी जाळी घातली आहे. नामपुर येथील बसस्थानक आवारात जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी मोसम प्रतिष्ठानचे जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल निकूभं, युवराज दाणी, योगेश वाणी, केदा सोनवणे, बापू जगताप प्रतीक कोकणे, मंथन कुमावत,टेंभे खालचे येथील सरपंच भाऊसाहेब आहिरे, पोलिस हवालदार निकेश कोळी, गायकवाड माऊली आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने