निसर्गमित्र समिति यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार नुकताच जायखेड़ा येथील पोलिस कर्मचारी रवीराज बच्छाव यांना प्राप्त झाला आहे,त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, तसेच राजकिय अशा सर्वच स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.त्यातच विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना. नरहरी झिरवाळ साहेब यांनी देखील नरकोल जखोड ता.सटाणा येथे कार्यक्रमाला आले असतांना बंदोबस्तात तैनात कॉन्स्टेबल रवीराज बच्छाव यांचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कौतुक केले.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जायखेड़ा पो.स्टेशनचे ए.पी.आय.पारधी साहेब,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*प्रतिक्रिया*
मला महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तीनी शुभेच्छा दिल्या,परंतु मा.ना.झिरवाळ साहेब यांनी दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी अधिकच प्रेरणादायी असतील.
- पो.कॉ.रवीराज बच्छाव.
(जायखेड़ा पोलिस स्टेशन)
