📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मराठा विद्याप्रसारक संस्थेचे शिक्षक सचिन पगारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

मनुष्यबळ विकास अकादमी,मुंबई यांच्यातर्फे राज्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिना सन्मानित करण्यात येते.या पुरस्कारासाठी कुकाणे (ता.मालेगाव) येथील  सुपुत्र तथा म.वि.प्र समाजाचे अभिनव बालविकास मंदिर देवगाव(ता.निफाड)येथील उपशिक्षक सचिन पगारे यांची निवड झाली आहे.राजस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न २०२० या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.पगारे हे तंत्रस्नेही शिक्षक असल्याने तंत्रज्ञानाच्या जोडीने ते अध्यापन करतात त्याचीच दखल घेत मुंबई येथील मनुष्यबळ विकास अकादमीने त्यांना सदर पुरस्कार जाहीर केला आहे.या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने