📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुन्हा एका कोविड सेंटरला आग, जणांचा मृत्यू, अहमदाबाद ची पुनरावृत्ती??

आंध्र प्रदेश : कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या काळात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजयवाडा मधील कोविड सेंटरमध्ये भीषण आग लाग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा  मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी आहेत. हे कोविड सेंटर विजयवाडामधील स्वर्ण पॅलेस हॉटेलमध्ये बनवण्यात आला होतं. खरे तर हे एक हॉटेल असून सध्या त्याचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे.

  दुर्घटना आज पहाटे ५ च्या सुमारास घडली. या कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे २२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती कृष्णाचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे दिसत आहे. आम्हा पुढील तपास करत आहोत, असे इम्तियाज म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने