📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शेतकरी बांधवांसाठी मालेगांव तालुका शेतकरी सहकारी संघ लि. यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत *मका, ज्वारी, बाजरी व रागी* या भरडधान्यांची खरेदीचा शुभारंभ

मालेगाव:- शेतकरी बांधवांसाठी मालेगांव तालुका शेतकरी सहकारी संघ लि. यांनी  किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत *मका, ज्वारी, बाजरी व रागी*  या भरडधान्यांची खरेदीचा शुभारंभ *कंक्राळे येथील शेतकरी बांधव श्री देवाजी गोबाजी कन्नोर* यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
         मुंबई व मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक, नाशिक जिल्हा कृषी औद्यीगिक सहकारी संघाचे चेअरमन, युवा नेते
*मा. डॉ.अद्वयआबा हिरे-पाटील*  यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटिंग फेडरेशनचे सब एजेंट म्हणून शेतकी संघाने सदर खरेदी योजना सुरू केली आहे.या खरेदी साठी डॉ.  अद्वयआबा हिरे-पाटील यांनी मार्केट मध्ये गोडाऊन उपलब्ध करून दिले आहे

     बुधवार, दि. २७ मे २०२० रोजी सकाळी मार्केट कमिटी गोडाऊन येथे  शेतकरी सह. संघाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका, ज्वारी, बाजरी व रागी या भरड धान्याची खरेदी शासकीय आधारभूत किंमतीत खरेदी सुरू केली आहे, याचा लाभ मालेगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा असे आवाहन,युवा नेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांनी केले  आहे. खरेदी केंद्र शुभरंभा प्रसंगी संघाचे चेअरमन श्री विठोबा छरंग, व्हा.चेअरम श्री भाऊसाहेब देवरे आणि संचालकांसह व्यवस्थापक श्री धर्मा अहिरे, सेवक तुषार बाविस्कर,तथा तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते
     सदर खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार असून कोरोनाच्या संकट काळात सर्व  शेतकरी बांधवानी   स्वतःची काळजी घेत भरड धान्य नोंदणी साठी येताना आधारकार्ड, ७/१२ उतारा, बँकेचे पासबुक आदींच्या झेरॉक्स आणावेत, तत्पूर्वी संघाचे मध्यवर्ती कार्यालय, समाजश्री प्रशांत दादा हिरे व्यापारी संकुल येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने