वडाळा ता :-26 कलाशिक्षक हा शाळेचा आत्मा असून
समाजाला घडवण्याबरोबर,कलागुण संस्कार घडवून मुलांचा सर्वांगीण विकासात कला शिक्षक मोलाची भूमिका बजावतात.
पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक ही शासनाची ही भूमिका घातक असून हे कुठे तरी थांबायला हवे,यामुळे कला शिक्षक आणि शाळा संपूष्टात येतील.कला जिवंत राहिली तरच शाळा जिवंत राहतील..असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले.ते माध्यमिक शिक्षण विभाग,के के वाघ शिक्षण प्रसारक मंडळ आणि कला शिक्षक महासंघ,व्हिजन कला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुख हॉल येथे आयोजित सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कला शिक्षकांसाठी प्रात्यक्षिक मार्गदर्शन कृतीसत्र कार्यशाळेप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कलाशिक्षक महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे,प्राचार्य सचिन जाधव,अधिष्ठाता बाळ नगरकर,प्राचार्य मुरलीधर रोकडे,चंद्रशेखर चिंचोले,चंद्रशेखर देशपांडे,सुरेश लासुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार भगरे सर पुढे म्हणाले की,शासनाची धोरण शिक्षण क्षेत्राला मारक असून ज्या शिक्षणा क्षेत्रावर देशाच उद्याचं भवितव्य घडणार आहे त्यावरच शासन कात्री लावण्याचे काम करत आहे,ही शोकांतिका आहे.शासनाने शिक्षण क्षेत्रावर सहा टक्के निधी खर्च केला पाहिजे पण तो अडीच टक्केच केला जात आहे.हे दुर्दैव आहे.6 टक्के निधी शिक्षण क्षेत्राला मिळावा म्हणून माझा पाठपुरावा सुरु असून 500 विद्यार्थी मागे एक कलाशिक्षक ह्या जाचक निर्णयाविरुद्ध केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन 240 विद्यार्थ्यांमागे एक कलाशिक्षक यांची नेमणूक पवित्रपोर्टल मार्फत करण्यात यावी,नाशिक जिल्यातील कलाशिक्षकांची थकीत बिले,ए टी डी टू ए एम स्केल मान्यताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांची भेट घेणार असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले..गेले अनेक महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरु आहे, त्यांच्या रास्त मागणीला पाठिंबा दर्शवत त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून दत्तात्रय सांगळे यांनी कलाशिक्षक संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन शासनाच्या जाचक निर्णया विषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी नाशिक जिल्यातून इडियन आयडॉल या स्पर्धेत निवड झाल्या बद्दल प्रतिक सोळसे याचा खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेच्या सत्रात प्रख्यात नृत्य दिग्दर्शक नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांगनानी सादर केलेल्या शिववंदना कथक नृत्य अविष्काराने उपस्थितांची वाहवा मिळवली.सुनीता शिंदे नृत्य,गायन, प्रतिक सोळसे,ओंकार वैरागकर,नाट्य गणेश गायकवाड,प्रा भूषण कोंबडे,रवींद्र कांगणे,डिजिटल पेंटिंग-स्वप्नील अहिरे,फलक लेखन-देव हिरे,भारत पवार,निसर्गचित्र-दीपक वर्मा,स्थिर चित्र राजेश सावंत,कॅलिग्राफी महेंद्र जगताप,स्मरण चित्र राहुल पगारे यांनी प्रात्यक्षिक सादर करून करून मार्गदर्शन केले. दरम्यान कलाशिक्षकांच्या पद भरती तसेच इतर मागण्यांविषयी लेखी निवेदन व ठराव करण्यात आला.प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय सांगळे,विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर सावंत,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोखंडे,जिल्हा अध्यक्ष सचिन पगार,सचिव मिलिंद टिळे,संदीप पवार,उपाध्यक्ष योगेश रोकडे,भारत पवार,संजय बोरसे,देव हिरे महेंद्र झोले,प्रदीप अहिरे यांनी केले आहे.सूत्रसंचालन योगेश कड आभार सचिन पगार यांनी मानले.
दरम्यान सोमेश्वर मुळाने यांनी संकलित केलेल्या 80 देशातील पोस्टाची तिकिटे, 31 देशातील चलन,शिवरायांच्या काळातील शिवराय,मोहरा, चांदीची नाणी प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याचे उदघाट्न प्रल्हाद साळुंखे,संजय चव्हाण राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले
प्रतिक्रिया..
भारतीय संस्कृतीला नृत्य शैलीचा अथांग वारसा लाभलेला आहे. प्राचीन शास्त्रीय नृत्य शैलीचे जतन करणे काळाची गरज आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अध्यापनात नृत्या समावेश करण्यात यावा..
कीर्ती भवाळकर
(प्रख्यात शास्त्रीय कथक नृत्य दिग्दर्शक,नृत्यांगणा)
नाशिक जिल्यातील शिक्षण अधिकारी यांनी शासन निर्णयाचा अभ्यास करून ए टी डी टू ए एम स्केल मान्यता साठी अडवणूक करू नये. धुळे जिल्यात सर्व मान्यता मिळाल्या असून
कलाशिक्षक महासंघ व्हिजन कला शिक्षक संघटना सातत्याने कला शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत आहे, सर्व कला शिक्षकांनी एकजुट होऊन संघटनेच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे..
प्रल्हाद साळुंखे
(संस्थापक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक
महासंघ )
फोटो...
: 1)कार्यशाळेत विविध प्रात्यक्षिक करून दाखवताना तज्ञ् मार्गदर्शक कलाशिक्षक कलाकार..