📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केबीएच विद्यालयात माजी मुख्याध्यापकांचा सन्मान

 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे प्राचार्य प्रफुल्ल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य नितीन गवळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक पी.आर.पाटील,. डी.यु. पाटील , बी.वाय.पाटील , व्ही.एल. साळुंखे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विश्वास पगार, जेष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे, पर्यवेक्षक राजेश धनवट , व्याख्याते आर.डी. शेवाळे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
    यावेळी अनिकेत वाघ, निखिल कदम, अर्पित जगताप, अनिकेत भोसले, संभाजी पगार,चंचल अहिरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
   व्याख्याते राजेंद्र शेवाळे यांनी ज्ञान मिळाल्यावर ज्ञानाचा गर्व करू नये विद्यार्थ्यांनी गुरूकडून, शिक्षकाकडून ज्ञान घेऊन स्वतःच्या जीवनाचा उद्धार करावा असा उपदेश केला.
     प्रमुख अतिथी माजी प्राचार्य बी.वाय. पाटील यांनी गुरु शिष्याची महती गाताना टेक्नॉलॉजीच्या युगात गुरुचे महत्व कमी होत आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य गुरु करतात म्हणून गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे असे मत मांडले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचलन परीक्षीत नेरकर यांनी केले . आभार डी.डी. अहिरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने