📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खमताणे येथील मल्हार प्रतिष्ठान तर्फे गणेश उत्सव सोहळा संपन्न

(प्रतिनिधी: चेतन बागुल, खमताणे)
         गणपती बाप्पाला पाण्यातच का विसर्जन केले जाते .यामागे काही धार्मिक कारणे आहेत तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडित आहेत. निसर्गाची एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो.खमताणे येथील मल्हार प्रतिष्ठान तर्फे यंदाचा गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गणेश उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व कला तसेच निपुत्रता याला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मल्हार प्रतिष्ठान खमताने सर्कलच्या उपक्रमाबाबत सकारात्मक सुरू होतो आहे मल्हार प्रतिष्ठान खमताने यांच्यात तर्फे मंडळात विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी नृत्य स्पर्धा ,दांडिया रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची, लिंबू चमचा ,निबंध स्पर्धा अशा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्यामार्फत करण्यात आले होते. रोज नवीन नवीन मान्यवरांकडून गणेशाची आरती व पारितोषिक वितरण करण्यात आले होते. सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाजीराव पोवार साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भारती साहेबांनी मल्हार प्रतिष्ठान या मंडळाला भेट देऊन साहेबांच्या हस्ते आरतीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे 
 यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
मल्हार प्रतिष्ठान तर्फे मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. 
मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच गावातून भव्य रूपाने गणपतीची मूर्तीची मिरवणूक काढत बेंजो च्या तालात नाचत गाजत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप मल्हार प्रतिष्ठान खमताने यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धिरज बिरारी उपाध्यक्ष उमेश खैरनार ,मधुकर साबळे ,राजेंद्र खैरनार, श्याम पवार ,नंदू पवार, दिनेश पवार, समाधान पवार ,राजेंद्र बागुल, प्रमोद साबळे,सोनु इंगळे,धनंजय वाघ, विशाल बागुल,अरचीत सोनवणे, चेतन बागुल, महेश बागुल आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने