📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान मोठे- प्रा. आंबेकर यांचे प्रतिपादन

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.


महेंद्र पगार(मालेगांव ग्रामीण टीव्ही51 न्यूज प्रतिनिधी)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबादास पाचंगे, प्रास्ताविक महेंद्र पगारे यांनी, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अदिती काळे यांनी केले.

यावेळी इतिहास विभागातील प्रा. वर्षा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीचे महत्व सविस्तर पणे सांगितले. यावेळी महाविद्यालयातीलच रसायनशास्त्र विभागातील प्रा. कामेश गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याची उपस्थितांना माहिती दिली.

यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपाप्रचार्य प्रा. जितेंद्र मिसर यांनी भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील महिलांच्या योगदाणाची सविस्तर अशी माहिती उपस्थितांना दिली. तर यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने दुर्गेश्वरी शेवाळे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर म्हणाले की, जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूल निवासी असलेल्या आदिवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या. या आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या रोजी जागतिक आदिवासी दिवस घोषित केला. आणि तेव्हापासून जगभरात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान मोठे राहिलेले असून त्यात तंट्या मामा भिल्ल, बिरसा मुंडा, वीर झलकारिबाई, राघोजी भांगरे, राया ठाकर, आशा अनेक आदिवासी शूरवीरांनी भारतीय स्वतंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावून आपल्या घरा-दारावर तुळशीपत्र ठेवले होते, त्यांच्या या योगदानचा इतिहास नव्याने लिहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य प्रा. शरद आंबेकर यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. कामेश गायकवाड, प्रा. वर्षा पवार, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा.अदिती काळे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. जिंकल विरमगामा, प्रा. रुची देवरे, प्रा. सोनम पाटील, प्रा.नेहा गांगुर्डे, प्रा. प्रियंका भामरे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने