नाशिक (दिनेश अहिरे- पाटिल)जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील माथाडी कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य करून न्याय देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व पदाधिकाऱ्यांनी केली.प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी माथाडी कामगारांनी पुकारलेल्या उपोषण स्थळी जाऊन भेट प्रहार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले..
उपजिल्हा प्रमुख पठाण उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तु बोडके महाराष्ट्र समन्वयक संध्याताई जाधव उपजिल्हा प्रमुख सविता खुटे संघटक वैशाली अनवट येवला तालुका अध्यक्ष मिना शिंदे आदी उपस्थित होते ..प्रहारचे जिल्हा अध्यक्ष शिंदे यांनी म्हटले की माथाडी कामगारांना शासनाने न्याय देण्याची गरज आहे चुकीच्या निर्णयाचा त्यांना मोठा फटका बसत आहे जिल्ह्यातील व्यापारांकडील थकीत लेव्हीची रक्कम कामगारांना त्वरित मिळावी.सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांमध्ये प्रचलित पद्धतीने कामकाज सुरू करावे.चार महिन्यापासून कामगारांना दरमहा मजुरी मिळाली नाही तरी त्यांना शासन बाजार समिती आणि माथाडी कामगार संघटनांनी त्वरीत आर्थिक मदत मिळावी प्रहार जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चु भाऊ कडु तसेच सर्व पदाधिकारी कामगारांच्या पाठीशी असुन शासन दरबारी साथ देणार असल्याचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी म्हटले..