📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आषाढी एकादशी निमित्त खमताणे गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये पालखी मिरवणूक सोहळा संपन्न


प्रतिनिधी चेतन बागुल खमताणे 
        : खमताणे येथील यशोधन शैक्षणिक व सामाजिक संस्था ठेंगोडा संचलीत गुरूकुल पब्लिक स्कूल खमताणे येथे आषाढी एकादशी पार पडली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष  जितेंद्र आहेर, संस्थेचे सचिव गोरख आहेर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी ह. भ .प. अणारे महाराज यांचे आषाढी एकादशी या विषयावर उद्बोधन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर काही विद्यार्थ्यांनी विठू माऊली च्या भजनावर तालात नृत्य केले. विविध संतांच्या वेशभूषा, वारकरी संप्रदायच्या वेशभूषेत आलेले बाल वारकरी,टाळ मृदुंगाच्या गजर, सजीव चित्ररथ भगवे ध्वज पथक आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत परिसर दुमदुमून गेला होता.
सुशोभित चित्ररथामध्ये विद्यार्थी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत उभे केले होते.तसेच बाल वारकऱ्यांनी आणि विद्यार्थीनी टाळकरींची वेशभूषा केली होती.विविध संतांच्या वेशभूषा करून महाराष्टातील वारकरी संत भुमिचे दर्शन घडविले. 
गुरुकुल पब्लिक स्कूल मधील सर्व मुली पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झालेल्या होत्या.
शाळेत सर्व विद्यार्थिनींनी रिंगण तयार करून अभंग गायन करत एका तालासुरात टाळ मृदंग वाजून नृत्य सादर केले.विठू माऊलीच्या गजराने शालेय वातावरण भक्तिमय झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने