📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

टाळ मृदुंगाच्या गजरात सटाणा येथून आषाढी वारीचे प्रस्थान

 राम कृष्ण हरी नामाचा जप करीत टाळ मृदुंगाच्या गजरात सटाणा येथून आषाढी एकादशीच्या निमित्त पायी वारीचा शुभारंभ देव मामलेदार  यशवंतराव महाराज यांचे दर्शन घेऊन ती देवांचे कीर्तनकार ह भ प नाना महाराज यांच्यात मार्गदर्शनाने करण्यात आला. या दिंडीचे मुंजवाड येथे स्वागत करण्यात आले.  
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मुंजवाडचे ग्रामस्थ ह भ प चिंधा म्हसू जाधव मळगाव चे ग्रामस्थ ह भ प पितांबर बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने वारीचा शुभारंभ करण्यात आला होता. ती परंपरा आजही सुरू आहे .गेल्या वीस वर्षापासून नाना महाराज तिळवणकर यांच्या मार्गदर्शनाने वारी अविरत चालू आहे. दुपारी मुंजवाड येथे आगमन झाल्यानंतर लोक नियुक्त सरपंच यशश्री निलेश जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन तसेच तुळशी वृंदावनाची पूजा करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरी अण्णा जाधव ग्रामपंचायतीचे वसुली अधिकारी भिका जाधव, मुरलीधर जाधव, किरण पाटोळे आधी जण उपस्थित होते. पायी दिंडीत सटाणा, मुंजवाड ,मळगाव, नवे निरपुर तिळवण,वटार खमताणे, पिंपळदर,कंधाणे येथील आधी भाविक दिंडीत सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने