(मालेगाव) येथील सारा फाउंडेशन तर्फे आश्रय संस्कार आणि पुनर्वसन केंद्र येथील विद्यार्थ्यांना ख्रिस्तवासी सारा हिच्या जन्मदिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ सालाबदाप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विजय खरे आणि प्रा. सुनेत्रा खरे यांच्या परिवारातर्फे गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. डेव्हिड मेश्रामकर, मास्टर जोशुवा मेश्रामकर आणि मास्टर वेरॉन मेश्रामकर यांनी सहकार्य केले. प्रा. सुनेत्रा मेश्रामकर खरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आश्रय संस्थेच्या सौ शोभाताई जगताप या उपस्थित होत्या.
सारा फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
0