📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील महिला सुरक्षा आणि विकास समिती आणि रासेयो विभाग यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सलमा अब्दुल सत्तार ह्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या .महाविद्यालयाचे आय क्यू एस सी समन्वयक प्रा.मुनव्वर अहमद, भूगोल विभाग प्रमुख पवार विनोद कुमार, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा सफिया अन्सारी, डॉ. सावंत, डॉ . रुमाना खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी प्रास्ताविक केले. योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. योग प्रशिक्षक अश्विनी बागुल यांनी व्याख्यान आणि योगाच्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थिनींना योग आणि आरोग्य याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींना निकोप आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि पोषक अन्न याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. हुमायरा अन्सारी यांनी केले. प्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने