(प्राप्त माहितीनुसार सदर तरुणाचा तपास लागला असून, त्याचा मृतदेह छावणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत मिळून आला, पुढील तपास पोलीस करत आहेत)
मालेगाव, 20 जून 2024: मालेगावात परीक्षा देण्यास आलेला 26 वर्षीय कुलदीप उर्फ भटु सुधाकर पाटील नावाचा तरुण मालेगावमधील मोची कॉर्नर जवळील आयटीआय कॉलेजमधून बेपत्ता झाला आहे.
कुलदीप हा चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव येथील शिक्षक सुधाकर निंबा पाटील यांचा मुलगा आहे.
सुधाकर पाटील यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
कुलदीप उंच, गोरा रंगाचा, गोल चेहरा, काळे डोळे आणि सरळ नाक, लांब काळे केस आणि त्याची उंची अंदाजे 175 सेंटीमीटर आहे.
बेपत्ता झाल्यावेळी त्याने निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅंट आणि डोक्यावर काळी टोपी घातली होती.
त्याच्या पायात चप्पल आणि उजव्या हातात चांदीचे ब्रेसलेट होते.
त्याच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल फोन होता ज्यात 8788251053 क्रमांकाचे सिमकार्ड होते.
तुम्हाला कुलदीपबाबत कोणतीही माहिती असेल तर कृपया तात्काळ मालेगाव कॅम्प पोलीसांशी संपर्क साधा.
हवा. पवार : 9359132156
सुधाकर निंबा पाटील: मो.8999782204,9284113312, 9423918185
(सदर तरुणाचा शोध लागल्यास याच ठिकाणी बातमीत अपडेट करण्यात येईल)