📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात इंग्रजी विभाग, महिला सुरक्षा आणि विकास कक्ष आणि रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा अंतर्गत स्त्री रोग चिकित्सा दंतचिकित्सा आणि फुफ्फुस क्षमता चाचणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थित यांचा परिचय करून दिला. शिबिराचे आयोजन जे ए टी ट्रस्टचे अध्यक्ष अलहाज अन्सारी अनिस अहमद, सचिव अलहाज अन्सारी निहाल अहमद,रोटरी क्लब ऑफ मालेगावचे विजन चे अध्यक्ष रोटेरियन श्री दीपक शेलार, सचिव डॉ ज्ञानेश्वर सोनवणे, प्रोजेक्ट चेअरमन प्रा संजय कांडेकर आणि श्री सुनील बागुल यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ सपना भामरे आणि प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ गीतांजली भामरे, यांनी आपली सेवा विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिली. डॉ सपना भामरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वैयक्तिक रित्या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ गीतांजली भामरे यांनी विद्यार्थिनींची दंत तपासणी करून त्यांना आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले. फुफ्फुस क्षमता चाचणीसाठी सिपला ब्रीद फ्री लिमिटेड या कंपनीचे सहकार्य लाभले. त्यांनी ब्रीदोमीटरच्या द्वारे विद्यार्थिनींचे तसेच उपस्थित प्राध्यापक वर्गाची फुफ्फुस क्षमता चाचणी केली. काही गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थिनींना पुढील तपासणी साठी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन च्या तर्फे अध्यक्ष मान. श्री दीपक शेलार यांनी मनोगत व्यक्त केले आणि रोटरीच्य विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सबाहत्तुनिसा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.उम्मे अम्मारा, कु. इफ्रा, कु अफशा, कु.मरियम, कु. आफिया कौसर, कु मिस्बाह, कु. मुस्कान, कु.नसीम इ विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा मुनव्वर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आरोग्य शिबिराचा लाभ बहुसंख्य विद्यार्थिनींनी घेतला आणि रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने