दाभाडी येथील गिरणा पब्लिक स्कूलमध्ये २५ फेब्रुवारी २०२४ रोजी एक अविस्मरणीय आणि भव्य माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे १९९३ ते २००१ पर्यंतच्या पहिली ते आठवीच्या सर्व बॅचेस मधील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. शिक्षकांनाही आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटून खूप आनंद झाला.
यानंतर गुरूंनी विद्यार्थ्यांना जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची, आपुलकी, आदर आणि सदाचार यासारख्या मूल्यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील, मनिष संसारे आणि कामिनी देवरे यांनी केले.
अशा प्रकारे, गिरणा पब्लिक स्कूलमधील माजी विद्यार्थी मेळावा अनेक आठवणी आणि प्रेरणा देऊन यशस्वीरित्या संपन्न झाला.

