📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव : पत्नीचा मानसिक छळ करणा-या आरोपी पतीस ३ वर्षे सश्रम कारावास व २०,००० रु. दंड

मालेगाव : पत्नीचा मानसिक छळ करणा-या आरोपी पतीस ३ वर्षे सश्रम कारावास व २०,००० रु. दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी आरोपी मुस्तफा समसुध्दीन पिंजारी (वय २८, रा. अंबिकानगर, जुना वजई रोड, मदिना किराणा जवळ, धुळे) याच्या विरोधात आयेशानगर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या माहेरून आई, वडीलांकडून प्लॉट घेण्यासाठी २०,००,००० रु. आणावे या कारणास्तव तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून मारहाण करून जीवे ठार मारण्याचा धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीने याप्रकरणी आयेशानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध भादवि ४९८ (अ), ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोहवा/१२२९ डी. एस. खैरणारा यांनी केला. सरकारी वकील अॅड. श्रीमती नसरीन नेगग आणि अॅड. श्री. धिरज चौहान यांनी सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत केला.

या प्रकरणाचा निकाल ३१ डिसेंबर २०२३ रोजी मालेगावचे अति. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. संधु साहेब यांनी दिला. त्यांनी आरोपीला भादवि ४९८ (अ) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व २०,००० रु. दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा होईल.

या प्रकरणात अपर पोलीस अधिक्षक श्री. अनिकेत भारती आणि आयेशानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी श्री. पोशि/९७५ सुमित नानाभाउ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने