मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथेमनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला समर्थन देत सोयगाव येथेही साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. सोयगाव येथील मराठा समाजाने आज बुधवारी सकाळी ९ वाजता उपोषणाला सुरुवात केली. सोयगाव शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आरती करण्यात आली कार्यकर्त्यांनी या साखळी उपोषणाला सुरुवात केली, मराठा कार्यकर्त्यांनी "एकच मिशन मराठा आरक्षण', " एक मराठा लाख मराठा' चा नारा देत बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. सहभागी झालेल्या समाज बांधवांनी जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत यावेळी राजकीय नेते, पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातील अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेल्या अल्टिमेटची मुदत संपूनही निर्णय झाला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज सायंकाळी सात वाजता कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे दरम्यान निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात ज्यांच्या मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तो निर्णय मनोज जरांगे यांना मान्य नाही. त्यांनी सरकारकडे सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी केलीय, त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. या अहवालातील 11 हजार 500 नोदींनुसार कुणबी प्रमाणत्र देण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने 11 हजार 500 जणांच्या वंशजांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय मनोज जरांगे यांनी स्वीकारलेला नाही. “मी सकाळी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही निर्णय घेताना सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत म्हणून निर्णय घ्या. माझ्या माहितीप्रमाणे तसा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये. तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.