📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शेतीच्या वादातून महाल पाटणे येथे दोन गटात तुफान हाणामारी

वादात एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

देवळा दि १ : तालुक्यातील महाल पाटणे गावात गंगावाडी शिवारात शेतीच्या रस्त्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली असून ह्या हाणामारीत एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले असून या मध्ये एका महिलेचा समावेश आहे, सोबतच जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु यातील जखमींना मार जास्त लागल्याने त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, या बाबत देवळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून याबाबत देवळा पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत, या बाबत अधिक अशी की
बापू उखा चव्हाण हे महाल पाटणे येथील गंगावाडी शिवारात चारी क्रमांक ११ शिवारात आपल्या कुटुंबा सोबत येथे रहात असून त्यांनी शेजारी रहाणारे अशोक बाळू देवरे यांची शेती गट न २६३/४ हे ०.३५ गुंठे इतके शेत घेतले आहे, ह्या शेतात ते  काल दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास
करीत असताना जुन्या भांडणाची कुरापत काढत त्यांच्या शेजारी रहाणारे रमेश काशिनाथ देवरे, समाधान काशिनाथ देवरे, भाऊसाहेब काशिनाथ देवरे, प्रमिला रमेश देवरे, गुडाबाई समाधान देवरे, मिनाबाई भाऊसाहेब देवरे रोशन रमेश देवरे, दर्शन भाऊसाहेब देवरे, उत्तम चिंधा अहिरे, शरद उत्तम अहिरे, समाधान उत्तम अहिरे, निकिता समाधान अहिरे, प्रभाकर चंदा अहिरे, वाल्याबाई प्रभाकर अहिरे या सर्वांनी मिळून , हातात लोखंडी गज व काठ्यांनी बापू उखा चव्हाण, बायजबाई बापू चव्हाण, श्रीराम बापू चव्हाण, व संकेत चव्हाण यांना जोरदार शिवीगाळ व दमबाजी करत जबर मारहाण केल्याची फिर्याद शिवाजी उखा चव्हाण यांनी देवळा पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे,  त्या अनुषंगाने देवळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर न ३०४/२०२३ मध्ये भादवी कलम  326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास देवळा पोलीस स्टेशन करीत आहे. सोबतच जखमींवर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने