मालेगाव, ३ नोव्हेंबर २०२३: मालेगाव तालुक्यातील येसगाव बु. येथे अवैध दारू बनवण्याचा गुन्हा उघड झाला आहे. रणरागिणी पथकाने आज सकाळी १४.४० वाजता येथे कारवाई केली. या कारवाईत १४०० लिटर रसायन आणि ७०,००० रुपयांचा गुन्हयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणरागिणी पथक मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत येसगाव बु. येथे अवैध दारू बनवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली. कारवाईत एकुण १४०० लिटर रसायन आणि ७०,००० रुपयांचा गुन्हयाचा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रणरागिणी पथकाकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.
कारवाईत खालील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते:
रणरागिणी पथक, मालेगाव तालुका पोलीस ठाणे
मपोहवा / १८४६ सोनाली केदारे
मपोहवा / १६१० रुतिका कुमावत
मोना / १६९४ सत्यभामा सोनवणे
मपोशि/ १९४७ अंकिता बोडके
मपोशि/ २४८० शितल पावरा
पोशि/ १९५५ विलास सुर्यवंशी
चालक पो. हवा ४६० पुरुषोत्तम मोरे