📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा

देवळा, (गणेश आढाव सर) ३ नोव्हेंबर २०२३: देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोटबंदी काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंगळवार, ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथील मंत्रालयावर देधडक बेधडक अन्नत्याग आंदोलन मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी आज शुक्रवार, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी तहसिलदार देवळा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळा यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, नोटबंदी काळात त्यांनी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला होता. त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. यामुळे त्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांना कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे.
शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, त्यांना तात्काळ त्यांचे पैसे मिळावेत. अन्यथा त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होतील.

या निवेदन देताना ग्रामविकास समिती अध्यक्ष संजय दहिवडकर, भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा तालुका अध्यक्ष आकाश नाना थोरात, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल पगार, शेतकरी तुकाराम जाधव, जिभाऊ देवरे, अशोक जाधव, पंढरीनाथ कुंभार्डे, शरद जाधव, बाजीराव सोनवणे, मोठाभाऊ बच्छाव, निंबा अहिरराव, सुदाम अहिरराव आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने