📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मेशी सेवा सहकारी सोसायटीच्या उपसभापतीपदी भिला आहेर यांची बिनविरोध निवड

देवळा प्रतिनिधी : आढाव सर
           देवळा तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या मेशी सेवा सोसायटीच्या रिक्त झालेल्या उपसभापतीपदासाठी देवळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डी पी अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. धनंजय शिरसाठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण मेशीवाशीयांचे लक्ष लागले होते.
      निर्धारित वेळेत उपसभापती पदासाठी भिला आहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले .यावेळी सहाय्यक निबंधक देवकर , मेशी विकास सोसायटीचे सभापती मोतीराम शिरसाठ ,मावळते उपसभापती धनंजय शिरसाठ, ज्येष्ठ संचालक केदा शिरसाठ, माजी सभापती राजू शिरसाठ, संचालक बाबूलाल चव्हाण,सुधाकर बोरसे,संजय शिरसाठ, देवराम शिरसाठ,रतन अहिरे, संचालिका चंद्रभागाबाई जाधव, वत्सलाबाई बोरसे, सचिव भगवान बोरसे यांसह देवळा बाजार समितीचे संचालक शाहू शिरसाठ, मेशीचे माजी उपसरपंच भिका बोरसे,समाधान गरुड,अभिमन शिरसाठ व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. आहेर यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
  मेशी सोसायटीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना संचालक आणि सभासद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने