📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 12 भाविकांचा मृत्यू, 23 जखमी, मृतांमध्ये सर्व जण नाशिकचे

छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर 2023: समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. नाशिकच्या भाविकांना घेऊन जाणारी खासगी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मागून ट्रकवर जाऊन आदळली. यात 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण नाशिक येथील आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडीत 28 जण होते. अपघातात 12 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..

हा अपघातात वैजापूर तालुक्यात घडला आहे. समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यासमोर रविवारी (15 ऑक्टोबर) पहाटे दीड वाजता ही घटना घडली. वेगात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (MH 20 GP 
2212 ) आणि ट्रकची (MP 09 MH 6483 ) धडक झाली. टेम्पो ट्रॅव्हलरमधून 28 जण प्रवास करत होते. अपघातात 12 जण जागीच ठार झाले.

नाशिक येथील भाविक खासगी ट्रॅव्हलर गाडीने बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी येथे दर्शनासाठी गेले होते. परत येत असताना मृत्यूने 12 जणांना वाटेतच गाठलं. 

मृतांची नावे समोर आली असून, 
तनुश्री सोळसे (वय 5), 
संगीता अस्वले (वय 40), 
अंजाबाई जगताप (वय 38), 
रतन जगधने (वय 45), 
कांतल सोळसे (वय 32), 
रजनी तपासे (वय 32), 
हौसाबाई शिरसाट (वय 70),
 झुंबर गांगुर्डे (वय 50), 
अमोल गांगुर्डे (वय 50), 
सारिका गांगुर्डे (वय 40), 
मिलिंद पगारे (वय 50), 
दीपक केकाने (वय 47)
 यांचा समावेश आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये*
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

 अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 
मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात १२ जणांचा मृत्यू झाला व  अनेक जण जखमी झाले हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले,  अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या अपघातामुळे भाविकांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने