मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात डोळयांची साथ पसरत असलेने मालेगाव मनपाच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांनी काय करावे? काय करुन नये.. व कशी काळजी घेणे? याकामी खालील प्रमाणे जनजागृती करणेत येत आहे.
डोळे येणे म्हणजे काय ?
डोळे येणे म्हणजे कॉनजेक्टाइव्हाचे सुजणे ही डोळ्यांच्या पांढऱ्या भागावरील एक पातळ अस्तर असते आणि पापण्यांच्या आत असते डोळे संसर्गजन्य असल्यास पसरतात.
डोळे येण्याचे मुख्य चिन्ह आणि लक्षणे
✓ प्रभावित डोळ्याचा पांढरा भाग लालसर किंवा गुलाबी होणे.
✓ डोळ्यातून पाणी येणे.
✓डोळ्यात जळजळ होणे आणि खाज सुटणे.
✓खूप जास्त प्रमाणात म्युकस निघणे.
✓कॉन जेक्टिवा आणि पापण्या सुजणे.
✓डोळ्यात चुरचुर होणे.
✓डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे (खुपते) जाणवते.
✓दृष्टीक्षेपात अडथळे निर्माण होणे.
✓प्रकाशाची संवेदनशीलता.
✓ सकाळी उठल्यावर पापण्याचा केसांवर चिकट पदार्थ जमा होणे.
डोळे येण्याचे मुख्य कारणे
✓ संसर्ग सामान्यपणे एकमेकांशी संपर्क झाल्यावर आणि संक्रमित डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधने वापरल्याने पसरतो.
✓संसर्ग होण्याचे कारण परागकणाशी संपर्क, धुळीतले जिवाणू यापासुन पसरतो
✓वातावरणातील सामान्यतः पाहिले जाणारे त्रासदायक घटक जसे प्रदूषण (धूर धूके), स्वीमींग पूल मधील क्लोरीन आणि विषारी रसायने आहेत.
निदान आणि उपचार पध्दत
चिन्हे आणि लक्षणे आणि डोळ्याची तपासणी यावर आधारित, डॉक्टर (नेत्र रोगतज्ञ) डोळे आल्याचे निदान करण्यात सक्षम होतात डोळे तपासताना दृष्टीक्षेपावरील परिणाम, कॉनजेक्टिवा डोळ्याचे बाह्य ऊतक आणि डोळ्याच्या आतील रचना तपासतील. साधारणपणे हा आजार ५ दिवस राहु शकतो आठवड्यापेक्षा कमी राहतो. दीर्घकालीन संसर्गाच्या बाबतीत किंवा उपचारांना चांगला प्रतिसाद न मिळाल्यास, स्वॅब (म्युकस किंवा डिस्चार्जचा सॅम्पल घेणे) ची तपासणी केली जाते. डोळे येणे याचा उपचार कारणांवर अवलंबून असतो. जिवाणूंच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक दिले जातात, पण व्हायरल संसर्गासाठी नाही. व्हायरल संसर्ग सहसा आपोआप बरे होतात. आरामासाठी थंड पट्ट्या आणि आणि आय ड्रॉप्स दिले जातात डोळे आल्यावर कॉन्टॅक्ट लेंसचा वापर टाळावा.
आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांस संसर्ग होण्यापासून संरक्षित करू शकता:
• प्रभावित डोळयाला स्पर्श करु नये.
✓व्यवस्थित स्वच्छ हात धुणे.
✓ एकमेकांचे रुमाल आणि सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळावे.
✓वातानुकूलित वातावरणात हा संसर्ग झपाटय़ाने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या रुमाल, टिश्यू, साबण, टॉवेल, उशी अशा वस्तू इतरांनी वापरू नयेत.
✓डोळ्यांचा संसर्ग चार- पाच दिवस टिकतो, मग बरा होतो. पण या आजारावर स्वत:च्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत.
✓ डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना, अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना गॉगल वापरण्याचा सल्ला दिला जातो. या व्यक्तीला डोळे चोळण्याची इच्छा झाली तरी गॉगल घातल्यामुळे ते जाणीवपूर्वक टाळणे शक्य होते. यामुळे संसर्ग पसण्यालाही अटकाव होऊ शकतो.
मालेगाव महानगरपालिके मार्फत संसर्गजन्य डोळयांच्या आलेल्या साथी बाबत मा. भालचंद्र गोसावी सो., आयुक्त तथा प्रशासक, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांचे मार्फत सर्व नागरीकांना उपरोक्त प्रमाणे काळजी घेणे आणि तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांचे सल्लयानेच औषधोपचार करावा असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहिरे व अनिल पारखे (उपायुक्त तथा महिला व बालकल्याण अधिकारी ) यांनी केले आहे