मालेगाव प्रतिनिधी - मालेगाव शहरातील महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे नवीन बस स्थानकात " चालक दिना " निमित्त आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी एसटी बस चालकांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्यात सोबतच त्यांना आर.टी. ओ कार्यालय कडून वाहतूक सुरक्षा बाबत मार्गदर्शनही करण्यात आले त्याप्रसंगी बसस्थानकात निस्वार्थ सेवा करणारे व एसटी प्रेमी शरीफ भाई यांचा शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच मालेगाव एसटी आगारात नवीन नियुक्त झालेले स्थानक प्रमुख पदी दिपक रामराजे यांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले या कार्यक्रमास आर.टी.ओ. चे मोटार वाहन निरीक्षक कुमठेकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संघपाल कदम, मालेगाव बस स्थानकप्रमुख दिपक रामराजे, आम्ही मालेगावकर समितीचे निखिलजी पवार, सुशांत कुलकर्णी, दीपक पाटील, डॉ.प्रितेश लोढा, एसटी प्रेमी अतुल लोढा, अनिल पाटील व प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक भावेश गोसावी, वाहतूक नियंत्रक बर्डे व गरुड, सुमित पवार, माळी, शोयब, उपस्थित होते..
चालक दिनानिमित्त एसटी बस चालकांचा सत्कार; आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचा संयुक्त उपक्रम
0