जायखेडा ( विजयराज अहिरे) शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल जायखेडा येथे घडली असून आज सकाळी उघडकीस आली, ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने कठडे नसलेल्या विहिरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक अंदाजानुसार पाय घसरून पडल्यानेच सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आहे
संजय अर्जुन शेवाळे (संजु पारनेरकर) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, संजू पारनेरकर नावाने ते प्रसिद्ध असून, जायखेडा परिसरात तोडबटाईने शेती करत होते.
दरम्यान जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जायखेडा पोलीस करत आहेत..