📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव लाईव्ह च्या आवाहनाला प्रतिसाद; अनाथ मुलांना मिळाला शिवनिश्चिलकडुन मदतीचा हात....


राकेश आहेर :- चांदवड देवळा

   देवळा तालुक्यातील मेशी येथील भागाबाई जगदाळे यांचा ४ दिवसांपुर्वी अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. भागाबाई यांचे पती शांताराम जगदाळे यांचाही तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांची दोघंही मुले अनाथ झालेली आहेत. ही परिस्थिती मालेगाव लाईव्ह न्यूजच्या वतीने दाखविण्यात आली होती व आवाहन करण्यात आले होते की आई वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांना मदतीची गरज असल्याचा, त्या हाकेला अखेर पहिली मदत शिवनिश्चिल ट्रस्ट कडुन मिळालेली आहे.
    आई वडील गेल्यानंतर त्या मुलांच्या मागे उभे राहणारे मामा व मावशी असुन त्यांचीही परिस्थिती अतिशय बेताची आहे. ही परिस्थिती समजल्यानंतर शिवनिश्चिल चे अध्यक्ष यशवंत गोसावी व शिवनिश्चिलच्या टिमने मेशी येथे आज त्या मुलांची भेट घेतली व मुलांच्या येथुन पुढच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे यशवंत गोसावी यांनी त्यांच्या शिवनिश्चिल ट्रस्टच्या माध्यमातून अनाथांना मायेची सावली या हेतूने कुठलीचं मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत व त्यांना आपल्या मागे कुणीचं नाही याची कधी उणिवही भासु नये यासाठी राज्यभरातील जवळपास १५० च्या आसपास अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. यात वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, शालेय उपयोगी सर्व वस्तू तसेच ज्यांच्या मागे कुणीचं नातेवाईक मदतीला नाहीत अशांना खाण्यासाठीही आर्थिक मदत शिवनिश्चिल ट्रस्टच्या माध्यमातून यशवंत गोसावी करत आहेत. अशा अनाथ मुलांना येणाऱ्या एक ते दीड वर्षात भाजपचे जिल्हाध्यक्ष
 केदानाना आहेर यांच्या माध्यमातून या सर्व मुलांच्या सर्वोतोपरी मदतीसाठी हॉस्टेल आणि वृद्धाश्रमाचे काम देवळा येथे होणार आहे अशिही माहिती यशवंत गोसावी यांनी दिली.

*मदतीसाठी पुढे आला व्हाट्सअॕप ग्रुप*

    अनाथ मुलांचे शिवनिश्चिल चे कार्य बघुन ज्युनिअर कॉलेज मेशी येथिल २०१० च्या १२ वी च्या बॅंचकडुन व्हाट्सअॕप ग्रुपच्या माध्यमातून आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने फुल न फुलाची पाकळी म्हणून ₹५५०० (पाच हजार पाचशे) रुपयांची मदत शिवनिश्चिलकडे सुपुर्द केलेली आहे. यामुळे परिसरात त्यांचेही कौतुक होत आहे.
याशिवाय
जनता विद्यालय लोहोणेर ₹१००० 
इंजिनिअर जगदीश सपकाळे ₹ ५०० अशी आर्थिक मदत केली आहे

आणखी इतर बऱ्याच जणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे त्या सर्वांची नावे  लवकरच प्रसिद्ध करू


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने