📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासोळ येथे क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा

 प्रशांत गिरासे | वासोळ

वासोळ- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुरेश महिरे हे होते तर शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्या अशा थोर विरपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शामल भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आर. डी जाधव, डी.बी मोहन,वी.यु बागुल ,वी.बी देसले,एन.जे गोसावी सेवक वृंदांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने