📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नवीन प्रारूप गट गण रचनेत पाटणे गण संपुष्टात आल्यामुळे पाटणेकर संतप्त पाटणे गण कायम ठेवण्याची मागणी



     पाटणे (राजेश धनवट) मालेगाव तालुक्यातील पाटणे गण  जिल्हा परिषद व  पंचायत समिति स्थापनेपासूनच स्वतंत्र गण होता. प्रथमच आगामी निवडणुकांसाठी गट गणाचा प्रारूप आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला या रचनेत मालेगाव तालुक्यातील पाटणे गणाची  तोडफोड करण्यात आली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर पाटणे येथील नागरिकांनी हरकत घेतली आहे.नवीन रचनेत पाटणे गणाचे अस्तित्व संपुष्टात आलेले आहे ते  चुकीचे असल्याने त्यावर पाटणे येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नथू  रामचंद्र खैरनार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हरकत दिली आहे. तसेच आक्षेप घेतल्याने पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेत बदल करण्याची मागणी सरपंच राहुलाबाई अहिरे ,माजी सरपंच नथू खैरनार ,मालेगाव तालुका भाजपा  ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कैलास शेवाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, ज्येष्ठ नागरिक माणिकराव यशोद  , बांधकाम समितीचे अध्यक्ष पंडितराव  वाघ ,युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघ,दादाजी  जाधव,मधूकर धनवट,महेश खैरनार,विशाल खैरनार, जितेंद्र खैरनार आदींनी केली आहे.
    पूर्वीच्या पाटणे गणात पाटणे,टेहरे, मुंगसे,आघार व चिंचावड  असे एकूण पाच गावे होते. आता नवीन गण रचनेनुसार सौंदाणे  गणात पाटणे  गावाचा समावेश केलेला आहे. परंतु शासनाच्या निकषाप्रमाणे कुठले राष्ट्रीय महामार्ग एका गणात बाधा ठरू नये अशी रचना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली असताना तसेच दळणवळण, बाजारपेठ ,आरोग्य सेवा ,सिंचन व्यवस्था टेहरे ,पाटणे,आघार , चिंचावड  या गावांना लागून आहे. म्हणूनच पाटणे गाव हे सौंदाणे गणातील वगळून पाटणे गण  कायम  करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .पाटणे गावातील मतदारांची संख्या पाच हजार दोनशे पेक्षा अधिक असून पाटणे गावाचा समावेश जर सौंदाणे गणात केला तर पाटणे  येथील मतदारावर  अन्याय होणार आहे . ते तांत्रिक ,भौतिक व सामाजिक दृष्टीने गैरसोयीचे होणार आहे .
     पाटणे गण स्वतंत्र करावा या भावनेतून पाटणे  ग्रामपंचायत येथे  ग्रामसभा घेण्यात आली.   त्या  बैठकीत एकमताने ठराव करण्यात आलेला आहे. जर पाटणे गाव आणि स्वतंत्र गण  केला नाही तर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असे देखील मागणी ग्रामसभेत मान्य करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांचा आक्रोश जनभावनांचा विचार करून पाटणे गण  स्वतंत्र करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने