*प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव*
काल देवळा तालुक्यात विविध ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. उमराणे येथे सकाळी ९.०० वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उमराणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. कमलताई विश्वासराव देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उमराणे मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक विलास काका देवरे, जि. प. सदस्य यशवंत शिरसाठ, बाळू देवरे , ग्रामपंचायत सदस्य भरत देवरे , संदिप देवरे ,सचिन राजे देवरे , चिंचवे वि का सोसायटी संचालक सुभाष मोरे,गावातील ग्रामस्थ व समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बाळू देवरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बनवण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सुशोभीकरण करण्याचा पुर्ण खर्च मी करेन असे विलास काका देवरे यांनी सांगितले व मेंढपाळ बांधवांसाठी निवारा शेड उभारले जाईल असे आश्वासन सरपंच सौ. कमलताई देवरे यांनी दिले.
तसेच सायंकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची सहवादय मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचे आकर्षण म्हणजे कु. मनस्वी भाऊराव मोरे या मुलीने राजमातेची वेशभूषा केलेली होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्ते सर यांनी केले व आभार कुंवर सर यांनी मानले.