📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सुट्टी अखेरची ठरली; पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात नौदल अधिकाऱ्यासह एकाच कुटुंबातील 5 जण ठार

सांगली (दिनेश पगारे) : पुणे - बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे जाताना हा अपघात घडली आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले जयसिंगपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

नौदल अधिकारी आपली वहिनी आणि तीन पुतण्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा अंत झाल्याने जयसिंगपूरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे व पूर्वा शिरोटे अशी अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शिरोटे कुटुंबिय पिंपरी चिंचवड येथून जयसिंगपूरकडे निघाले होते. त्यावेळी कासेगावजवल रस्त्याच्या कडेला ऊभ्या असणाऱ्या कंटेनरला मागून कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रूग्णालयात दाखल करताना मृत्यू झाल्याचे समजत आहे.

याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या अपघातात कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने