प्रतिनिधी - दिनेश पगारे
जुन्या आठवणीना उजाळा देत भावविभोर झालेले मन, शालेय जीवनात शाळेने दिलेले संस्काराची शिदोरी व गुरूजणांप्रती जपुन ठेवलेली आदरयुक्त आस्था अशा वातावरणात बत्तीस वर्षांनंतर दहावी च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मिञ मैञिणींना भेटुन सर्वजनच अक्षरशः भारावून गेले होते. करंजगव्हाण येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या १९९०-९१ च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन करंजगव्हाण येथील बाल – संस्कार शाळेतील प्रांगणात झाले.सरस्वती पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजगव्हाण येथील न्यू इंग्लिश स्कूल चे निवृत्त मुख्याध्यापक श्री.जी.डी.खैरनार सर् होते.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती ।
दोन दिवसांची रंगत संगत,दोन दिवसांची नाती ।।
अशा शब्दात उपस्थितविद्यार्थ्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर बालपणी स्नेहाच्या भेटीचा आनंद स्पष्ट दिसत होता. भेटिला भावनेची किनार होती. सुमारे १०० विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.सर्वान्नी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय कुटुंबाविषयी जाणुन घेतले. पुन्हा आपण निरागस तनावविरहित जिवण जगायला मिळावे असे अनेकांना वाटत होते. बालपणीच्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
व्यासपिठावर श्री.जाधव सर , श्री.मगर सर , श्री. डी डी मिस्तरी सर, सौ.जाधव मॅडम , श्री. दोधा अण्णा शिंदे तसेच विद्यमान प्राचार्य श्री. शेवाळे सर तासेच अन्य शिक्षक उपस्थित होते. आपले विद्यार्थी विवीध ठिकाणी वेगवेगळया पदांवर कार्यरत असल्याने शिक्षकांनी आपल्या मनोगतात कौतुक केले.
यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. थट्टा, गप्पा, मस्करीला उधाण आले. तसेच सुरुची भोजनाची मेजवानी करण्यात आली. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे ठरविले.
करंजगव्हाण येथील डॉ.आनंद शिंदे,किरण शिंदे, तसेच श्री.नाना खैरनार,श्री प्रभाकर गोसावी यांनी जून्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी श्री हेमराज लहामगे, तुकाराम अहिरे,सौ. कल्पना धामणे,
श्री अशोक शेवाळे, श्री.प्रदिप पवार, सौ.सुरेखा भामरे, रंजना भामरे,गोविंद लहामगे,दिलीप शेलार, भाऊसाहेब पवार,लाला शेवाळे,उत्तम सोनवणे, गोरख अहिरे,आनंद सिंग, दिलीप शेलार, भाऊसाहेब पवार,