देवळा (प्रतिनिधी: प्रशांत गिरासे) तालुक्यातील वासोळ येथील ग्रामदैवत श्री नाथबाबा महाराज यात्रोत्सव सुरू असताना सट्टा बहाद्दरांच चांगभलं सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोना निर्बंधांमुळे सर्वत्र यात्रा, उरुस बंद होते परंतु यावर्षी सर्वत्र जोरात यात्रा उत्सव सुरू आहेत, अशातच अवैध धंदे यात्रोत्सवात आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे, तरुण पिढीला अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमुळे व्यसन लागून कर्जबाजारी होऊन नैराश्य वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत असते, त्यामुळे अशा गोष्टींवर कारवाई होणे गरजेचे असते.
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष.
यात्रेतील अवैध धंद्यावर देवळा पोलिस कारवाई करणार का ? पोलीस यंत्रणा यात्रोत्सवात फिरकल्या नाहीत का? असा संतप्त सवाल नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे