राकेश आहेर | चांदवड देवळा
हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ जाणता राजा मित्र मंडळ उमराणे तर्फे "वटवृक्ष लागवड" कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
उमराणे मावळखोऱ्यात जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. त्यातीलच महराणी सईबाई भोसले वटवृक्ष लागवड उपक्रम हा २०१८ पासून ते २०२५ या वर्षापर्यंत राबविण्याचा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार किल्लेदार व मावळ्यांनी योगदान दिले आहे. इतिहासाची जेवढी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे मंडळाच्या वतीने शुर योद्धयांच्या पराक्रमाचे स्मरण व्हावे व तरुणांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ध्यानात घेऊन गेल्या २८ वर्षांपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ उमराणे वतनातील परसूलनदीच्या तीरावरील स्वर्गविर निवृत्ती काका आठवडे बाजार आवारात वन अधिकारी माणिक साळुखे यांच्या हस्ते वटवृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कृ.उ.बा.स. सभापती प्रशांत देवरे, मा.सभापती विलास देवरे, पं.स. उपसभापती धर्मा देवरे, मुख्याध्यापक श्रीप्रकाश पाटील, वन सेवक रमेश साळुखे, चेरमन संदीप देवरे, भगवान देवरे, सुभाष गायकवाड, अरुण सोनवणे, बाळू देवरे, रवींद्र देवरे आदि उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांनी जाणता राजा मंडळाच्या कार्याचा गौरव करीत आजपर्यंत राबविलेल्या समाजउपयोगी कार्यामुळे ३५०-४०० वर्षानंतर आजही शिवरायांचे कार्य व त्यांचे सरदार, मावळे यांचा पराक्रमाचा वारसा मंडळाने अखंडपणे सुरु ठेवला आहे या शब्दात मंडळाचे कौतुक केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, प्रवीण देवरे, तात्या देवरे, योगेश देवरे, रामराव देवरे, अनंत देवरे, बाळा पवार, प्रदिप देवरे, दिनेश देवरे, शांताराम देवरे, अनिल देवरे, भाऊसाहेब पाटील, महेश पवार, गोरख देवरे, तात्या गायकवाड, भारत देवरे, आबा देवरे, डॉ. प्रवीण देवरे, जयेश देवरे आदींसह मंडळाच्या मावळ्यांसह ग्रामस्थ विशेष दरवर्षी मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
- आपणही समाजाचे काही देणं लागतो या उदात्त हेतूने महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त दरवर्षी 'जाणता राजा मित्रमंडळ उमराणे' च्या वतीने विविध उपक्रम आम्ही राबवितो. यात वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, खड्डे पडलेल्या रस्त्यावर मुरुमीकरण तसेच समाजातील अनेक छोट्या-मोठ्या समस्या निवारण्याचे काम मंडळातर्फे सुरू आहे आणी ते अखंडपणे सुरू राहील.
: नंदनराजे देवरे
अध्यक्ष जाणता राजा मित्रमंडळ उमराणे ता. देवळा, जिल्हा- नाशिक