सध्या सोशल मीडियावर व्हाट्सअप वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सोमालियातून ५०० टन केळी बाजारात आली असून त्यामध्ये हेलिकोबॅक्टर नावाचा जंतू असतो व तो पोटात विषारी द्रव सोडतो, त्यानंतर जुलाब, उलट्या, मळमळ, डोकेदुखी असे लक्षणे दिसून येतात. आणि १२ तासात त्या व्यक्तीचा मृत्यू होतो असा दावा करण्यात आला आहे.
परंतु मुळात ही केळी सोमालियातील भारतीय बाजारात आलीच नाहीत, भारत हा स्वतः जगातील सर्वात मोठा फळ उत्पादक देश आहे त्यामध्ये संपूर्ण जगातील केळीचे उत्पादन करण्याचे प्रमाण भारतात 25 टक्के आहे, त्यामुळे भारताला इतर कोणत्याही देशातून केळी आयात करण्याची गरज नाही.
दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हेलिकोबॅक्टर नावाचा जंतू त्याने केळीतून काढून दाखवला, मुळात हा व्हिडिओत दाखवलेला हेलिकॉबॅक्टर नावाचा बॅक्टेरिया नाही, कारण हेलिकॉबॅक्टर (पायलोरी) नावाच्या बॅक्टेरिया ला मनुष्य दुर्बिणी शिवाय नुसत उघड्या डोळ्याने बघू शकत नाही, त्यामुळे यातच सिद्ध होते की ही गोष्ट खोटी आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने दावा केल्याप्रमाणे कोणताही जंत केळी सारख्या फळांमध्ये जगू शकत नाहीत त्यांना जगण्यासाठी आवश्यक असे वातावरण केळीच्या गरामध्ये नाही, बॅक्टेरिया, आळ्या, आणि जंत यामध्ये खूप मोठा फरक आहे जंत हे मोठ्या आकाराचे लांबसडक असतात, अळ्या तर आपण रोजच कुठे ना कुठे बघत असतो, त्यामुळे केवळ लोकांना घाबरवण्यासाठी काही समाजकंटक असे व्हिडिओ शेअर करत असतात त्यामुळे नागरिकांनी सुज्ञपणा दाखवत अशा गोष्टींना बळी न पडता योग्य दृष्टीने विचार करत स्वतः काही गोष्टी ची शहानिशा करावी.