📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वडनेर खाकुर्डी पो.स्टे.ची धडक कामगिरी : विराणे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई

वडनेर (मालेगाव लाईव्ह न्यूज नेटवर्क)वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.गोकुळ शिलावट व श्री.गुंजाळ यांनी विराणे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) प्रमाणे कारवाई

सविस्तर वृत्त असे की वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.देवेंद्र शिंदे यांना विराणे येथे गावठी दारू ची विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी लगेचच पो.कॉ. शिलावट,गुंजाळ यांना मार्गदर्शन देत अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या भगवान बुधा निकम उर्फ बिजोरसेकर (वय ५०) रा. विराणे याला रगेंहाथ पकडले असुन त्याच्या कडून सुमारे २० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) प्रमाणे कारवाई केली.पुढील तपास श्री.गुंजाळ व श्री. शिलावट करीत आहेत.

कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक

अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे वडनेर खाकुर्डी पो.स्टे चे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.देवेंद्र शिंदे यांच्या सह पो.कॉ. गोकुळ शिलावट,श्री.गुंजाळ यांचे स्थानिक नागरीकांकडून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने