मनमाड | कल्पेश वैजापूरकर
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जनमानसामध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित झाले आहे, जगातील कुठलाही आजार हा विषाणू, बॅक्टेरिया अशा घातक गोष्टींमुळे सर्वाधिक प्रमाणात होतो,
वैयक्तिक स्वच्छतेमध्ये मुख्यत्वे आपल्या हातांची स्वच्छता महत्त्वाची असते, अशातच विद्यार्थ्यांनाही वैयक्तिक स्वच्छतेची गोडी लागावी त्याचे महत्त्व समजावे यासाठी
मराठा विद्याप्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर, मनमाड येथे आज दि. 14 ऑक्टोंबर 2021 रोजी
जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला,
यावेळी विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक स्वच्छता, टापटीप, तसेच आरोग्यविषयक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच हात धुण्याच्या पद्धती बाबत प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले,
सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उस्फूर्तपणे या उपक्रमास प्रतिसाद देत सर्व गोष्टींबाबत ज्ञान आत्मसात करून घेतले.
जगामध्ये कोरोना महामारी ने अनेकांचा बळी घेतला, मुख्यत्वे नाकातोंडात द्वारे कोरोनाचे विषाणू शरीरात प्रवेश करत होते, परंतु मास्क वापरणे व वारंवार हात धुतल्यामुळे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात येतो हे सिद्ध झाले त्यानुसार वारंवार हात धुतले तर इतरही आजार आपण टाळू शकतो, अशाप्रकारचा आगळा वेगळा उपक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला या उपक्रमप्रसंगी अभिनव बालविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवरे पी.एल सर यांनी प्रस्तावना केली तसेच शाळेचे शिक्षक श्री.सचिन बी. पगारे सर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे मार्गदर्शन केले. आणि श्री. चोळके एस.बी सर , श्रीम. वाघचौरे एल.टी मॅडम श्री. वाघ आर. एस सर , श्री.पवार जे. बी सर ,श्रीम. मगर व्ही.एन मॅडम, श्रीम. जाधव एस.डि मॅडम ,श्री. शेवाळे एस.डि सर यांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी कदम सर, केवडे सर,
निलेश पाटील मामा उपस्थित होते