मालेगाव कॅम्प (किरण बागुल) शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्या मा सौ प्रमिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपशिक्षिका सौ के पी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत दि 5 सप्टेंबर रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून विद्यालयात साजरा करण्यात आला. विद्यालयातील अधिकारी वर्गामार्फत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ नेरकर माधवी यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.
तसेच शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी *Thank A Teacher* या अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन, स्वरचित कविता लेखन इ. स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आली आणि त्यात पहिले तीन क्रमांक काढण्यात आले.
शिक्षक दिन साजरा करण्यासाठी विद्यालयातील प्राचार्या सौ प्रमिला पाटील, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे, उपमुख्याध्यापिका सौ साळुंखे आर जे, पर्यवेक्षिका सौ ठाकरे एल जे व सौ शेवाळे पी एस, सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.